विशेष बातम्या
"लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी – अजित दादांचा विश्वास, हप्ता लवकरच तुमच्या खात्यात!"
By nisha patil - 5/29/2025 3:27:04 PM
Share This News:
"लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी – अजित दादांचा विश्वास, हप्ता लवकरच तुमच्या खात्यात!"
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मिळणाऱ्या बहिणींच्या मनात मे महिन्याच्या हप्त्याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. एप्रिलचा हप्ता मेच्या सुरुवातीलाच जमा झाला, मात्र मेचा हप्ता अद्याप आलेला नव्हता.
पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः पुढे येत दिलासा दिला आहे. त्यांनी नुकतेच ३.३७ कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच मे महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा होणार आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच यावर अधिकृत घोषणा करणार आहेत.
मागील हप्त्यांप्रमाणेच, मे महिन्याचा हप्ता २५ ते ३१ तारखेच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे.
आता उरलेत फक्त ३ दिवस! त्यामुळे बहिणींनो, तयार राहा! तुमच्या खात्यात लवकरच येणार १५०० रुपयांचा हप्ता!
"लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी – अजित दादांचा विश्वास, हप्ता लवकरच तुमच्या खात्यात!"
|