बातम्या
शहाजी महाविद्यालयात कॉमर्स फोरमचे उत्साहात उद्घाटन .
By nisha patil - 8/18/2025 4:33:00 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात कॉमर्स फोरमचे उत्साहात उद्घाटन .
कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमर्स फोरम 2025-26 च्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण एस. कायंदे (प्रोजेक्ट ऑफिसर, जिल्हा उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर) व राहुल गोरे (उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर) उपस्थित होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते, तर IQAC चे समन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. एस. एच. कांबळे (वाणिज्य विभाग प्रमुख) यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी कॉमर्स फोरम स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला तसेच मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कॉमर्स फोरम 2025-26 चे उद्घाटन पार पडले. प्रमुख पाहुणे मा. श्री प्रवीण एस. कायंदे यांनी "उद्योजकता व स्वयंरोजगार" या विषयावर मार्गदर्शन करत MCED मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली व या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर राहुल गोरे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी विद्यार्थ्यांनी उद्योग-व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. एम. ए. शिंदे यांनी केले. या प्रसंगी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहाजी महाविद्यालयात कॉमर्स फोरमचे उत्साहात उद्घाटन .
|