आरोग्य

पंचगंगा रुग्णालयास आयुक्त डॉ.राजेद्र भारुड यांची भेट

Commissioner Dr Rajendra Bharud visits Panchganga Hospital


By nisha patil - 9/5/2026 11:25:48 AM
Share This News:



पंचगंगा रुग्णालयास आयुक्त डॉ.राजेद्र भारुड यांची भेट

 

कोल्हापूर, ता. ७ : आज दुपारी १.०० वाजता आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी महापालिकेच्या श्री पंचगंगा रूग्णालय येथे अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान रुग्णालयाची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली. तसेच रुग्णालयातील विविध विभागांना भेट दिली. यावेळी रुग्णालयाकडील प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या काळे-हेरवाडे यांनी रुग्णालयाकडील सर्व विभाग व कामकाजाची माहिती दिली.

 

रुग्णालयात स्वच्छता, साफ सफाई व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचाराबाबत पेशंट यांच्याशी चर्चा केली. रुग्णालायाकडील आरोग्यविषयक माहिती देणारे बोर्ड व दिशा दर्शक बोर्ड इत्यादी बाबत उत्तम कामकाज असल्याचे समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे हजर असणाऱ्या स्टाफच्या टीमवर्कची प्रशंसा केली. इथून पुढे पंचगंगा रूग्णालय हे शासनाकडील कायाकल्प, एन्कोस यासारख्या विविध क्वालिटी एशुरेन्स प्रोग्राम मध्ये आपला पहिला क्रमांक पुन्हा पटकाविण्याकरिता मार्गदर्शन केले.

 

तसेच त्याबाबत काही अडचणी असल्यास सदर अडचणी दूर करण्याचे आश्वसनही आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. यावेळी रुग्णालय मधील सर्व स्टाफ उपस्थित होता.


पंचगंगा रुग्णालयास आयुक्त डॉ.राजेद्र भारुड यांची भेट
Total Views: 3