राजकीय

इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी कटीबध्द..मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Committed to providing clean and abundant water to Ichalkaranji city  Minister Hasan Mushrif assures


By nisha patil - 12/1/2026 5:10:39 PM
Share This News:



इचलकरंजी, दि. १३:
इचलकरंजी शहराला मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत आहे. या शहराला स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहोत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने इचलकरंजी शहराचा रखडलेला पाणी प्रश्न येत्या दोन वर्षात कायमचा निकालात काढू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दिली. इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलू. शहराचा पहिला लोकनियुक्त महापौर महायुतीचाच करा, असे आवाहनही त्यांनी केले.         
        
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या प्रभाग क्र. दोनमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कृष्णनगर येथे आयोजित जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रभारी वृषभ जैन होते.
         
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजी शहराच्या पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वैशिष्ट्यपूर्ण कामे, पर्यावरण या मूलभूत सोयीसुविधा तर निर्माण करूच. तसेच; संपूर्ण शहराचा प्रभागनिहाय नियोजनबद्ध विकास करू.
         

इचलकरंजीला देशाच्या नकाशावर आणू.......!
श्री. मुश्रीफ म्हणाले, केंद्रासह राज्यात सत्ता महायुतीची आहे. जिल्ह्यात दहा आमदार आणि या विभागाचे खासदार महायुतीचे आहेत. इचलकरंजी महापालिकेची सत्ता महायुतीला द्या. शहरांमधील सुधारणांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. स्मार्ट सिटी बनवून येणाऱ्या काळात शहर देशाच्या नकाशावर आणू.   
            
यावेळी नितीन जांभळे व बंडा मुसळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.                 
      
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, माजी आमदार अशोकराव जांभळे, महायुतीचे उमेदवार सौ. शुभांगी प्रधान माळी, राजू कबाडे, श्रीमती मंगल बंडा मुसळे,  सुहास जांभळे यांच्यासह कार्याध्यक्ष अमित गाताडे आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
............
      
इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या प्रभाग क्र. दोनमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कृष्णनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुहास जांभळे व समोर उपस्थित नागरिक.       


इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी कटीबध्द..मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
Total Views: 23