बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात अंतर्गत तक्रार समितीचे कार्य व भूमिकाया विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 9/13/2025 3:33:09 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात अंतर्गत तक्रार समितीचे कार्य व भूमिकाया विषयावर व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि. 13 : विवेकानंद कॉलेज कोल्हापूर (अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्था) येथे अंतर्गत तक्रार समितीचे कार्य व भूमिका या विषयावर डॉ. अस्मिता पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अस्मिता पाटील यांनी या समितीची रचना व सुरुवात कशी झाली तसेच या समितीचे कार्य कसे चालते, समितीला असलेले अधिकार, 2013 चा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये संबंधित विषयाची जागरूकता आवश्यक आहे तसेच पारदर्शक संवाद गरजेचा आहे असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .आर. कुंभार यांनी अंतर्गत समितीचे महत्त्व निर्विवाद आहे तसेच आपली काही तक्रार असल्यास विद्यार्थी महाविद्यालयातील तक्रार निवारण समितीकडे तक्रार करू शकतात. असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. उर्मिला खोत यांनी केले. आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले, सूत्रसंचालन डॉ. नीता पाटील यांनी केले.कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ. श्रुती जोशी, समिती सदस्य प्रा. सृष्टी कोरे व प्रा. मंगेश खोले उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात अंतर्गत तक्रार समितीचे कार्य व भूमिकाया विषयावर व्याख्यान संपन्न
|