बातम्या
जनसुरक्षा विधेयक व महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
By nisha patil - 4/22/2025 8:37:13 PM
Share This News:
जनसुरक्षा विधेयक व महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे , गॅसचे वाढलेले दर कमी करा,स्मार्ट वीज मीटर सक्ती रद्द करा या व अन्य मागण्यांसाठी आज कागल तसीलदार कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कागल तालुका कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आलीत. आज डाव्या पक्षांच्या वतिने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून कागल तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने करीत करण्यात आली.मागण्याचे निवेदन कागल तहसीलदारांना देण्यात आलं.यावेळी स्मार्ट मिटरच्या प्रश्नावर व कृषी पंपाच्या लोड शेडिंगच्या प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन तहसीलदारांनी दिलं.
यावेळी कॉ .शिवाजी मगदूम, राज्य कमिटी सदस्य माकप,तसेच राजु आरडे, विनायक सुतार, दिनकर जाधव, जोतिराम मोगणे, शिवाजी लोहार, सिद्राम खिरूगडे, रंगराव जाधव, मारूती कांबळे, सुभाष पाटील, यलाप्पा पाटील, पांडुरंग मोरबाळे, बंडा भांडवले ,युवराज शिंदे, गणेश पाटील, शिवाजी पोवार
जनसुरक्षा विधेयक व महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
|