विशेष बातम्या

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सामुदायिक ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रम

Community Shravan Vrat Vaikalya


By nisha patil - 9/8/2025 1:08:46 PM
Share This News:



श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सामुदायिक ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रम
 

कोल्हापूर, दि. 09 – कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशन यांच्या वतीने 11 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 6.00 ते रात्री 10.00 या वेळेत “नष्टे लॉन, महावीर गार्डनजवळ, कोल्हापूर” येथे सामुदायिक श्रावण व्रत वैकल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात कावडीने आणलेल्या पंचगंगा नदीच्या पवित्र जलाने श्री महादेव पिंडी व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिषेकाने होईल. त्यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन, शस्त्रपूजन, अकरा नवदाम्पत्यांसह यज्ञ, देवपूजन, भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे.

यावेळी 108 दाम्पत्य केळीच्या पानावर मंत्रघोषात सात्विक भोजनाद्वारे उपवास सोडतील. कार्यक्रमात एस्कोन भजनी मंडळाचा भजन-जप व मार्गदर्शनपर फलकांचे प्रदर्शन होणार आहे. पाच हजारांहून अधिक हिंदू बांधवांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.

हा उपक्रम हिंदू धर्माचे जागरण व संघटन, तसेच सर्व पोटजाती, जमाती, बारा बलुतेदार यांना एकत्र आणण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.


श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सामुदायिक ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रम
Total Views: 102