बातम्या

पंत वालावलकर हायस्कूल मध्ये उद्देशिकेचे सामुदायिक वाचन

Community reading of the preamble at Pant Walawalkar High School


By nisha patil - 11/26/2026 3:19:40 PM
Share This News:



पंत वालावलकर हायस्कूल मध्ये उद्देशिकेचे सामुदायिक वाचन
 

कोल्हापूर  : येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांतारामपंत वालावकर हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला . यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "संविधानाचे शिल्पकार "या भित्तीपत्रिकेचे अनावरण मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामुदायिकरित्या उद्देशिकेचे वाचन केले . शाळेच्या विद्यार्थिनी वैदेही बळी हिने मराठी संविधान उद्देशिकेचे वाचन तर सादिया मुजावर हिने इंग्रजी संविधान उद्देशिकेचे वाचन केले . भारताची संसद सभागृहे, कायदे कसे तयार होतात, संविधान माहिती, डॉक्टर बाबासाहेबांची जीवनगाथा या संदर्भात अनुक्रमे वैष्णवी खोत, आराध्या इंगवले, जोया मुल्ला,आर्या एडगे,सिद्धी कांबळे,हर्षदा रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून योग्य तो समन्वय साधा आणि न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूलतत्त्वांचे पालन करणे विषयी विद्यार्थ्यांना आवाहन केले . हर्षदा यमगर्णीकर हिने सूत्रसंचालन तर अनुष्का रोकडे हिने आभार प्रदर्शन केले आठवी अ चे वर्गशिक्षक प्रशांत दळवी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले . यावेळी ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कागले, सुनील साजणे, संतोष पोवार, संजीत सणगर,शीतल अलमान, सिद्धी कपिलेश्वरी, जयवंत साखरे, राजेंद्र बनसोडे,विमल धायगुडे,समीर जमादार, अनुपमा पन्हाळकर,विश्वास माळी आदी मान्यवर उपस्थित होते


पंत वालावलकर हायस्कूल मध्ये उद्देशिकेचे सामुदायिक वाचन
Total Views: 10