बातम्या

मनपाविरुद्धच्या नुकसानभरपाई दाव्याला नकार; गडकर कुटुंबाच्या दोन अपिलांना १२ डिसेंबरला सुनावणी

Compensation claim against Municipal Corporation rejected


By nisha patil - 11/22/2025 5:35:39 PM
Share This News:



मनपाविरुद्धच्या नुकसानभरपाई दाव्याला नकार; गडकर कुटुंबाच्या दोन अपिलांना १२ डिसेंबरला सुनावणी

कोल्हापूर : शहर आराखड्यात वाहन पार्किंग तळ म्हणून आरक्षित असलेल्या सि.स.न. 462 / ब.या 1999 मधील जागेबाबत केलेल्या तोडफोड कारवाईवरून दाखल झालेल्या दाव्याला न्यायालयाने नकार दिल्यानंतर, त्या निकालाविरुद्ध दाखल झालेल्या दोन अपिलांची पुढील सुनावणी १२ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.

निवृत्ती गणपत गडकर यांनी स्पे.क. क्रमांक 46/2001 (नवीन क्रमांक रे.क. 299/2012) ने कोल्हापूर महानगरपालिका, पृथ्वीराज रामराव शिंदे आणि रवींद्र विलास घाडगे यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.त्यांनी मनपाने चुकीच्या पद्धतीने पाडापाड केली असून रु. 4,66,700 इतकी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती.

तथापि, दि. 30 ऑगस्ट 2012 रोजी न्यायालयाने दावा पूर्णतः फेटाळला आणि मनपाचा पक्ष कायम ठेवला. या निकालाविरुद्ध गडकर कुटुंबातील दोन सदस्यांनी वेगवेगळी अपिले दाखल केली आहेत—

  • रेग्युलर दिवाणी अपील क्रमांक 434/2012 – हेमंत निवृत्ती गडकर

  • रेग्युलर दिवाणी अपील क्रमांक 448/2012 – शिवाजी निवृत्ती गडकर

दोन्ही अपिलांमध्ये न्यायालयाने दि. 23 ऑक्टोबर 2012 रोजी स्टेटस को आदेश दिला असून, प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख 12 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.


मनपाविरुद्धच्या नुकसानभरपाई दाव्याला नकार; गडकर कुटुंबाच्या दोन अपिलांना १२ डिसेंबरला सुनावणी
Total Views: 29