बातम्या
*देशी दारु दुकानदार छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांच्याकडून घेत असलेची तक्रार
By nisha patil - 3/11/2026 3:35:09 PM
Share This News:
*देशी दारु दुकानदार छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांच्याकडून घेत असलेची तक्रार
*ग्राहक पंचायत समितीचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन
*आजरा(हसन तकीलदार ):-देशी दारू विक्रेते दुकानदार बॉटलवरील छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम घेवून बॉटलची विक्री करतात. जे सर्वसामान्य गरीब आहेत त्यांच्याकडून छापील किमतीपेक्षा जास्त किंमत घेऊन बाटली विकली जाते त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊन पिळवणूक केली जात आहे. यावर कारवाई होण्याबाबत ग्राहक पंचायत परिषद महाराष्ट्र, कोल्हापूर यांनी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक गडहिंग्लज यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ८० रु. किंमतीच्या बॉटलला ९० रु. घेतात तर ४० रु.च्या बॉटलला ४५ रु. घेतात.
खरे तर कोणतेही व्यसन माणसाने करु नये त्यामुळे शरीराची वाताहत होते शिवाय घरच्या लोकानाही मानसिक त्रास होतो. त्यामुळे दारुबंदी असावी असा विचार करणारी आम्ही मंडळी आहोत परंतु कितीही प्रबोधन केलेतरी काबाडकष्ट करणारा सर्वसामान्य मजूर, शेतमजूर, गवंडी, कामगार, हमाल असा कष्टकरीवर्ग दिवसभर अंगमेहनतीचे काम करणारी मंडळी देशी दारु घेत असतात तर काही मंडळी चैनीसाठी उच्च दर्जाची दारु पित असतात. आम्ही गरीब कष्टकरी जनतेचा विचार करणारी मंडळी आहोत दारुचा विषय आहे म्हणून त्यांचे कडून प्रत्येक बॉटलमागे १० रु. जादा घेणे म्हणजे गोरगरीब कुटुंबाच्या घरातील १० रु. चुकीच्या मार्गाने घेउन त्यांची लुबाडणूक करणे होय.
त्यामुळे आमच्याकडे काही लोकानी तक्रार केली आमच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाची तक्रार निवारण करणे आमच्या संघटनेचे कर्तव्य आहे. मग किराणा दुकानदार असो,स्टेशनरी दुकानदार असो अगर बेकरी दुकानदार असो तक्रारीचे निवारण करणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे जादा पैसे दारु दुकानदार घेत असल्याची खात्री करूनच आपणाकडे निवेदन दिले जात आहे.
तरी आपण सर्व दुकानदाराना ताबडतोब सुचना करणे, जादा पैसे घेणेचे बंद व्हावे असे आपणास सूचित करण्यात येत आहे तसेच आपल्या कार्यालयाकडून कोणकोणत्या बाबीवर दैनिक कामकाज केले जाते याची कृपया माहिती द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवाजी गुरव (विभाग प्रमुख), बस्तु बार्देस्कर (गडहिंग्लज तालुका अध्यक्ष), महादेव सुतार (आजरा तालुका अध्यक्ष),अनिल कलगुटगी (गडहिंग्लज ता. सचिव),तानाजी कुराडे (गडहिंग्लज ता. उपाध्यक्ष),सौ रोहिणी चौगुले (गडहिंग्लज ता. महिला प्रमुख)यांच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारीसो, कोल्हापूर,उपविभागीय अधिकारीसो, गडहिंग्लज,पो.नि.सो. गडहिंग्लज आजरा यांनाही देण्यात आल्या आहेत.
*देशी दारु दुकानदार छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांच्याकडून घेत असलेची तक्रार
|