आरोग्य

सीपीआर व शेंडा पार्कची कामे वर्षाअखेरीस पूर्ण करा मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

Complete CPR and Shenda Park works by the end of the year Minister Hasan Mushrif's directives


By nisha patil - 6/26/2026 11:46:28 AM
Share This News:



कोल्हापूर | प्रतिनिधी : 

छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयाच्या नूतनीकरण झालेल्या इमारतीचे लोकार्पण पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

शेंडा पार्क येथील विविध विकासकामांचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ यांनी १२५ निवासी डॉक्टरांचे वसतिगृह, प्रत्येकी १५० क्षमतेची मुला-मुलींची वसतिगृहे, १५० क्षमतेचे नर्सिंग हॉस्टेल व प्रशिक्षण केंद्र, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण, बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्ट तसेच विश्रामगृहाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

उर्वरित सर्व कामे वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश देत त्यांनी पाणी, रस्ते, वीज आणि एसटीपी (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) कामांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले. तसेच सीपीआर रुग्णालयातील अपूर्ण कामांचाही त्यांनी स्वतंत्रपणे आढावा घेतला.

बैठकीस अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, माजी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. शिशिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बुरुड, डॉ. अनिता सैबनवार, मानसिंग जगताप, हर्षदीप घाटगे, क्रांतीकुमार मिरजकर, समीर मोमीन यांच्यासह संबंधित अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.


सीपीआरला नवे रूप शेंडा पार्क विकासकामांचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा
Total Views: 19