बातम्या
नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा - प्रशासक के.मंजुलक्ष्मी
By nisha patil - 4/22/2025 8:35:20 PM
Share This News:
नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा - प्रशासक के.मंजुलक्ष्मी
इराणी खणीतील गाळ काढणेचा प्रस्ताव दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना
नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या. तर सार्वजनिक गणेश उत्सव 2025 च्या अनुषंगाने इराणी खणीतील गाळ पावसाळयापुर्वी काढण्यासाठी तातडीने दोन दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिल्या. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईचे कामे सुरू आहेत. त्या अनुषंगाने आज सकाळी आयुक्त कार्यालयात नाले सफाई कामाची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी उर्वरित चॅनल्स, नाले व मॅनहोल यांची सफाई लवकरात लवकर करुन घ्यावी. सर्व नोडल अधिकारी व उप-शहर अभियंता यांनी त्यांच्या त्यांच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालयात वेळोवेळ फिरती करुन नाले सफाई कामाची तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. यासाठी विभागीय कार्यालयस्तराव सर्व कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरिक्षक यांची बैठक घेऊन कामाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी,याच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा - प्रशासक के.मंजुलक्ष्मी
|