बातम्या

शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे 

Complete registration for Farmer Identity Card number by April 30


By nisha patil - 4/24/2025 6:07:36 PM
Share This News:



शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे 

शेतकरी ओळख क्रमांकासाठी 30 एप्रिल अंतिम मुदत

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळख क्रमांक आवश्यक

 कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. कोणताही पात्र शेतकरी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ॲग्री स्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी नोंदणीची जिल्हास्तरीय ऑनलाईन आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत येडगे यांनी सांगितले की, 21 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 4 लाख 6 हजार 322 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी येत्या 30 एप्रिलपूर्वी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करावा.

 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालंदर पांगरे यांनी सांगितले की, 15 एप्रिलपासून कृषी योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करावी.


शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे 
Total Views: 125