राजकीय

कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकांचे संपूर्ण निकाल जाहीर

Complete results of the mayoral elections in Kolhapur district announced


By nisha patil - 12/21/2025 1:01:15 PM
Share This News:



कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष निवडणुकांचे संपूर्ण निकाल जाहीर झाले असून विविध पक्षांनी आपली ताकद दाखवली आहे. एकूण १३ नगराध्यक्ष पदांपैकी शिवसेना (शिंदे गट) ४ जागांवर विजयी ठरली असून भाजपने ३ जागांवर यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), जनसुराज आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी २ जागांवर विजय मिळवला आहे.

पेठवडगाव येथे काँग्रेस व स्थानिक आघाडीच्या उमेदवार विद्याताई पोल विजयी ठरल्या आहेत. शिरोळ येथे काँग्रेसच्या योगिता कांबळे यांनी बाजी मारली. चंदगडमध्ये भाजपचे सुनील काणेकर, आजरामध्ये अशोक चराटी तर हुबळी येथे भाजपचे मंगलराव माळगे विजयी झाले आहेत.

शिवसेना (शिंदे गट) कडून मुरगूड येथे सुहासिनीदेवी पाटील, जयसिंगपूर येथे संजय पाटील, कुरुंदवाड येथे मनीषा डांगे यांनी विजय मिळवला असून हातकणंगले येथेही शिंदे गटाचा उमेदवार विजयी ठरला आहे.

जनसुराजकडून मलकापूर येथे रश्मी कोठावळे आणि पन्हाळा येथे जयश्री पवार विजयी झाल्या आहेत. गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महेश तुरबत्मठ तर कागलमध्ये सविता माने यांनी नगराध्यक्षपद पटकावले आहे.

या निकालांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात नव्या आघाड्या आणि सत्तासमीकरणे स्पष्ट होत असून आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे


कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकांचे संपूर्ण निकाल जाहीर
Total Views: 134