बातम्या
शिरोळ तालुक्यातील पाचवा मैल ते सलगरे राज्यमार्ग १५३ मधील अर्धवट कामे पूर्ण करा
By Administrator - 2/28/2026 12:03:37 PM
Share This News:
शिरोळ तालुक्यातील पाचवा मैल ते सलगरे राज्यमार्ग १५३ मधील अर्धवट कामे पूर्ण करा.
सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या देखरेखीखाली मे. राजपथ कन्स्ट्रक्शन लि. यांनी राज्यमार्ग १५३ सलगरे ते पाचवा मैल या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी केले आहे. हा मार्ग सांगली जिल्ह्यातील सलगरे येथून सुरू होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पाचवा मैल येथे संपतो.
पण सदरच्या कामांमध्ये शिरोळ तालुक्यात ठिकठिकाणी रस्ता,रस्त्याचे डिव्हायडर ,साईड पट्ट्या ,गटारीचं काम अपूर्ण राहिलेल आहे . प्रामुख्याने अर्जुनवाड ते शिरोळ यादरम्यान एक किलोमीटर रस्त्याची पूर्ण एक बाजू डांबरीकरण राहिलेली आहे . त्याचप्रमाणे शिरोळमध्ये कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूचे जोड,जोडणे तसेच गटारीचे काम अपूर्ण आहे.पुढे कुरुंदवाड मध्ये शिवतीर्थ व महाराणा प्रताप चौक या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे . सदर अपूर्ण कामामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तात्काळ वरील रस्त्याच्या कामातील त्रुटी पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असे आशयाचे निवेदन आज सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना देण्यात आले .
यावेळी कार्यकारी अभियंता श्री मिरजकर हे हजर नव्हते त्यामुळे उपकार्यकारी अभियंता सौ.करवी मॅडम यांनी निवेदन स्वीकारून याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन महिन्याभरात सर्व कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, आनंदा भातमारे ,मंगेश नलावडे, मुस्तफा इनामदार इत्यादी उपस्थित होते.
शिरोळ तालुक्यातील पाचवा मैल ते सलगरे राज्यमार्ग १५३ मधील अर्धवट कामे पूर्ण करा
|