बातम्या
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची कामे पूर्ण करा
By nisha patil - 9/28/2026 11:03:28 PM
Share This News:
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची कामे पूर्ण करा
महावितरणचे कार्यकारी संचालक परेश भागवत (देयक व माहिती तंत्रज्ञान) यांचे आदेश
कोल्हापूर, दि. २८ सप्टेंबर २०१६ : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून १०० टक्के दिवसा वीज देण्याकरिता विशेष प्रयत्न करा. आवश्यक तेथे अतिरिक्त वीज वाहिन्या उभारणे, रोहित्रांची क्षमता वाढवणे आदी कामे प्राधान्याने पूर्ण करा, असे आदेश कार्यकारी संचालक (देयक व माहिती तंत्रज्ञान) यांनी दिले आहेत.
महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ऊर्जा शक्ति सभागृहात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत कार्यकारी संचालक(देयक व माहिती तंत्रज्ञान) परेश भागवत बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सांगलीचे अधीक्षक अभियंता अमित बोकील उपस्थित होते.
यावेळी बोलताना परेश भागवत पुढे म्हणाले, ‘कोल्हापूर परिमंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत एकूण १९३ सौर प्रकल्प प्रस्तावित असून त्यांची एकत्रित क्षमता १०६० मेगावॉट आहे. सध्या ७५ सौर प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून निर्माण होणार्या ३९२ मेगावॉट वीजेमुळे कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ९१५ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. राज्यातील सर्व शेतकर्यांना दिवसा वीज देण्याचे शासनाचे उद्दीष्ट असून कोल्हापूर परिमंडलातील उर्वरित शेतकऱ्यांनाही दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने कामे लवकर पूर्ण करा. काही ठिकाणी अतिरिक्त कामे करणे आवश्यक असल्यास अशा कामांना मुख्यालयातून गरजेनुसार तत्काळ मंजूरी देण्यात येईल. गरज असेल तेथे अतिरिक्त मनुष्यबळ लावून कामे पूर्ण करा.
रोहित्रांचे मैपिंग व मीटरिंगचे काम १०० टक्के पूर्ण करा. यामुळे विजेचे अकाउंटिंग, वीज वापर व इतर माहितीचे विश्लेषण करता येईल. सर्व चालू वीज वाहिन्या ऑनलाईन सिस्टमला जोडून घ्या. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत काम न करणाऱ्या व कामात हलगर्जीपणा करणार्या एजन्सीला काळ्या यादीत टाकून नवीन कंत्राटदार नेमून काम पूर्ण करावे, असे निर्देश कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची कामे पूर्ण करा
|