खेळ
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटूचा सत्कार
By nisha patil - 6/14/2025 10:22:18 PM
Share This News:
कोल्हापूर : दक्षिण आफ्रिकेतील ९० कि.मी.च्या जगप्रसिद्ध 'कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन' स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरच्या १२ धावपटूंचा सत्कार आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार जयंत आसंगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
कोल्हापूरच्या चेतन चव्हाण, अमोल यादव, दिलीप जाधव, डॉ. केतकी साखरपे, आम्रपाल कोहली यांच्यासह १२ धावपटूंनी ही खडतर स्पर्धा पूर्ण केली. यामध्ये दोन महिला धावपटूंचा समावेश होता. स्पर्धेतील अनुभव सांगताना अमोल यादव यांनी ९० कि.मी. अंतर ७ तास ५१ मिनिटांत पूर्ण केल्याची माहिती दिली.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. महादेव नरके, संजय मोहिते, उत्तम फराकटे आदी उपस्थित होते.
Comrades Ultra :कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटूचा सत्कार
|