राजकीय

ट्रान्सफर झालेली बोगस मते रोखण्यासाठी अटी शर्ती लावणे गरजेचे -सुनील शिंदे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी*

Conditions need to be imposed to prevent bogus votes transferred


By nisha patil - 10/31/2025 3:31:04 PM
Share This News:



ट्रान्सफर झालेली बोगस मते रोखण्यासाठी अटी शर्ती लावणे गरजेचे -सुनील शिंदे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी*
 

आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायत तसेच जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरवात होत आहे. प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठी आपापल्यापरीने नियोजन लावत आहे. मते ट्रान्सफर करण्याचे काम सुरु असून अनेक वेळेला अशी ट्रान्सफर केलेली मते ही बोगस असू शकतात आणि अशी बोगस मते लोकशाहीचा गळा चिरण्याचे काम करतात. हे होऊ नये म्हणून अशा मतदारासाठी अटी शर्ती लावण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
 

  निवेदनात म्हटले आहे की, ट्रान्सफर मतदार हे अनेक वेळेला पाच वर्षात दोन ते चार वेळेला मतदान करतात. त्यामध्ये एकदा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच एखाद्या राज्याची निवडणूक लागली की त्या राज्याच्या शेजारील सीमाभागातील लोक आपली मते निवडणूक लागलेल्या राज्याच्या सीमाभागातील पाहुण्यांच्या घरी ट्रान्सफर करतात आणि मतदान करतात. मतदान झाल्यानंतर सहा महिने ते एक वर्षामध्ये आपल्या पूर्वीच्या ठिकाणी ट्रान्सफर होऊन येतात आणि आपल्या राज्याची निवडणूक लागली की तेथेही मतदान करतात.

दोन राज्याच्या निवडणूकीमध्ये एक ते दीड वर्षाचे अंतर असल्याने अशा प्रकारची मते हलवणे शक्य असते. अशा प्रकारे हे मतदार पाच वर्षात चार ते पाच वेळा मतदान करतात यासाठी मतदाराने एकदा मत ट्रान्सफर केले की पाच वर्षानंतर तो आपले मतदान ट्रान्सफर करण्यास पात्र असावे, शासकीय कर्मचाऱ्यांना बदलीसाठी तीन वर्षाची अट असल्याने तीन वर्षानंतर तो आपले मतदान ट्रान्सफर करू शकेल. सोबत बदली आदेश जोडणे सक्तीचे असावे.

प्रशासकीय बदली झालेस प्रशासकीय आदेश जोडून त्याला विनाअट मत ट्रान्सफर करून घेणेचा अधिकार असावा अशा अटी लावण्याची  मागणी या निवेदनातून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांचेकडे सुनील शिंदे यांनी केली आहे.सदर बाबींची योग्य चौकशी करून त्या त्या स्वायत्त संस्थेस त्याबाबत कळवणेत येईल असे आश्वासन दिले असलेबद्दल आमच्या प्रतिनिधिशी बोलताना शिंदे यांनी सांगितले.


ट्रान्सफर झालेली बोगस मते रोखण्यासाठी अटी शर्ती लावणे गरजेचे -सुनील शिंदे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी*
Total Views: 372