बातम्या
‘डायबेटिक फूट’वर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये परिषद
By nisha patil - 6/18/2025 9:50:27 PM
Share This News:
‘डायबेटिक फूट’वर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये परिषद
कोल्हापूर, दि. १८ : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या वतीने शनिवार, २१ जून रोजी ‘डायबेटिक फूट’ विषयावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडिया (DFSI) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होणार असून, देशभरातील नामवंत डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.
मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या जखमा, गँगरीन आणि अपंगत्व या गंभीर समस्यांवर चर्चा होणार असून, वैद्यकीय विद्यार्थ्यांसह कोल्हापूर परिसरातील डॉक्टरांसाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे.
या परिषदेमध्ये मुंबईचे डॉ. अरुण बाळ, डॉ. संजय वैद्य, डॉ. मिलिंद रूके, डॉ. शैलेश रानडे व हैदराबादचे डॉ. श्रीनिवास यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सर्जरी, मेडिसिन, अस्थिरोग आणि अनाटॉमी विभागांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले असून, कुलगुरू डॉ. राकेश शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती डॉ. अमित बुरांडे यांनी दिली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद पार पडणार आहे.
‘डायबेटिक फूट’वर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये परिषद
|