राजकीय

चंदगडकर मतपेटीतूनच विरोधकांच्या दहशतीला उत्तर देतील मंञी हसन मुश्रीफ यांना विश्वास

Confidence in Minister Hasan Mushrif


By nisha patil - 1/12/2025 11:22:52 AM
Share This News:



चंदगड, दि. ३०: आम्ही जनतेला सबल करण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी राजकारण आणि समाजकारण करतो. परंतु, विरोधकांकडून चंदगडमध्ये सुरू असणारे दहशतीचे वातावरण पाहून हे कसले राजकारण सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणू. परंतु, चंदगडकर या दहशतीला घाबरणारे नाहीत हे या निवडणुकीत दाखवून देतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 
         
चंदगड नगरपरिषदेच्या निवडणूकच्या निमित्ताने आयोजित छञपती शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 
            
मंञी मुश्रीफ पुढे म्हणाले, दुरदृष्टी असणारे नेतृत्व सत्तेत गेले तर काय होवू शकते, याचे उदाहरण कागल शहरात जावून पहा. कागलच्या धर्तीवर चंदगड शहराचाही सर्वांगीण विकास करण्याचे अभिवचन देतो.
         

माजी आमदार राजेश पाटील म्हणाले,  विरोधक आम्ही यापूर्वी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम सुरू आहे. खोटे जाहिरनामे काढून लोकांची फसवणूक केली जात आहे. व्यसनाच्या नादी लावून युवकांना बिघडविण्याचे काम सुरू आहे. येथील जनता भोळी आहे पण अन्यायाविरोधात एकदा उभी राहिली तर काय करु शकते हे विरोधकांनी दोन डिसेंबरला पाहावे.
                
डाॅ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, चंदगडच्या विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही एकत्र आलो आहे. चंदगडमध्ये जातीय सलोखा आणि सर्वधर्मसमभाव राहावा.यासाठी सुरक्षित चंदगड व्हावा यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. येथील स्वच्छ पाणी पुरवठा योजना पूर्ण करु, तसेच, आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु.
       
चंदगडच्या विकासाला मोठा हातभार लावू...
चंदगडमधील ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करु, येथील कचरा व्यवस्थापन करुन शहराचा कोपरा अन् कोपरा चकाचक करु, युवकांसाठी क्रिडांगण, रवळनाथ मंदिर परिसरासह सर्व चौक सुशोभिकरण, येथील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. येत्या पाच वर्षात १०० कोटींचा निधी आणून शहराचा सर्वांगीण विकास करु, अशी ग्वाहीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.


चंदगडकर मतपेटीतूनच विरोधकांच्या दहशतीला उत्तर देतील मंञी हसन मुश्रीफ यांना विश्वास
Total Views: 17