विशेष बातम्या

मतदार यादीतील गोंधळ...

Confusion in the voter list


By nisha patil - 9/12/2025 3:51:10 PM
Share This News:



मतदार यादीतील गोंधळ...

इतरही रहिवास पुरावे ग्राह्य धरा – माजी नगरसेवकांची मागणी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या मतदार यादीत झालेल्या गोंधळानंतर भाजपाच्या माजी नगरसेवकांनी हरकतींसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड यांसारखे इतर रहिवास पुरावेही ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे.
 

महानगरपालिकेकडून केवळ मतदान ओळखपत्रावरील पत्ता मान्य केला जात असल्याने अनेक नागरिकांचे नावे चुकीच्या प्रभागात गेल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचनांची अंमलबजावणी न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही देण्यात आला.
 

यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, चंद्रकांत घाटगे आदी उपस्थित होते.


मतदार यादीतील गोंधळ...
Total Views: 13