बातम्या

गडहिंग्लजमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार..

Congress


By nisha patil - 10/24/2025 3:02:35 PM
Share This News:



गडहिंग्लजमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार..

येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढणार!

येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहर व ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (24 ऑक्टोबर) पार पडली.

या बैठकीत कसबा नुल, नेसरी, गिजवणे, भडगांव आणि हलकर्णी या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका मोठ्या ताकदीने आणि एकजुटीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, तसेच दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, सोमगोंड आरबोळे, अनिल कुऱ्हाडे, विद्याधर गुरबे, महेश तुर्बतमठ, बाळासाहेब पाटील, गणपतराव डोंगरे, सचिन रेडेकर, रवी चौगुले, जोतीराम केसरकर आणि रविंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत संघटन मजबूत करून पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.


गडहिंग्लजमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार..
Total Views: 65