बातम्या
निवडणूक याद्यांवरील हरकतीसाठी काँग्रेसची १५ दिवसांची मुदत वाढवण्याची मागणी...
By nisha patil - 11/25/2025 5:02:07 PM
Share This News:
निवडणूक याद्यांवरील हरकतीसाठी काँग्रेसची १५ दिवसांची मुदत वाढवण्याची मागणी...
हरकतीसाठी अधिक वेळ आवश्यक – काँग्रेस निवडणूक आयुक्तांकडे अर्ज
राज्यातील महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गैरसोय लक्षात येत असल्याने काँग्रेसने राज्य निवडणूक आयुक्तांकडे हरकतीची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील आणि पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे १५ दिवसांनी मुदत वाढवावी अशी विनंती केली आहे.
पत्रात म्हटले आहे की अनेक महानगरपालिकांमध्ये मतदार नावे चुकीच्या प्रभागांत दाखल झाली आहेत. हरकतीसाठी अर्जाची पद्धत जटिल असून आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांची संख्या मोठी असल्याने प्रारूप मतदार याद्या तपासण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. काँग्रेसने मतदारांबाबत स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी मुदत वाढवावी अशी मागणी केली आहे.
निवडणूक याद्यांवरील हरकतीसाठी काँग्रेसची १५ दिवसांची मुदत वाढवण्याची मागणी...
|