बातम्या
काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांच्या मुलाखती; दुसऱ्या दिवशी १९४ जणांची उमेदवारीची मागणी
By nisha patil - 12/19/2025 3:43:43 PM
Share This News:
काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांच्या मुलाखती; दुसऱ्या दिवशी १९४ जणांची उमेदवारीची मागणी
कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, गेल्या दोन दिवसांत एकूण ३२९ इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेस कमिटीच्या वतीने दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, या दिवशी १९४ जणांनी उमेदवारीची मागणी केली. यापूर्वी मंगळवारी १३५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
गत महापालिकेत काँग्रेसने सत्ता काबीज केल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पक्षाकडे इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे. प्रभागांची रचना मोठी झाल्याने अनेक इच्छुकांना आपली राजकीय स्वप्ने बाजूला ठेवावी लागण्याची शक्यता असली, तरी पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका सर्वच प्रभागांतील इच्छुक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्यासमोर व्यक्त केली.
या मुलाखती माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, आनंद माने, राजू लाटकर, भारती पोवार, सरलाताई पाटील आणि भरत रसाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुकांमध्ये यशोदा रविंद्र आवळे, जयश्री सचिन चव्हाण, सचिन चव्हाण, रियाज सुभेदार, उदय पोवार, ईश्वर परमार, वृषाली दुर्वास कदम, पद्मजा भुर्के, माणिक मंडलिक, प्रवीण सोनवणे, भूपाल शेटे, शमा मुल्ला, विनायक फाळके, अमर समर्थ, विजय सूर्यवंशी, शिवाजी कवाळे, आश्विनी अनिल कदम, संजय मोहिते, सुरेश ढोणुक्षे, पद्मावती काकासाहेब पाटील, उत्तम शेटके, शोभा कवाळे, प्रवीण केसरकर, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, वनिता देठे आणि प्रतिक्षा पाटील यांचा समावेश होता.
काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांच्या मुलाखती; दुसऱ्या दिवशी १९४ जणांची उमेदवारीची मागणी
|