राजकीय

महाराणी ताराराणी जयंतीनिमित्त महिलांना समर्पित काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित

Congress releases manifesto dedicated to women on the occasion of Queen Tara Ranis birth anniversary


By nisha patil - 7/1/2026 1:35:50 PM
Share This News:



महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त महिलांना समर्पित काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बुधवारी भवानी मंडप येथे भव्य कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना व अभिप्रायावर आधारित

यावेळी बोलताना खासदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या धोरणांची गरज अधोरेखित केली. महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्वावलंबनासाठी काँग्रेस पक्षाने हा जाहीरनामा तयार केला असून, शहरातील सर्व महिला, भगिनी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन प्रवासासाठी केएमटी बस सेवा पूर्णतः मोफत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीरनाम्यात समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी ठोस आणि भविष्याभिमुख आराखडा असलेला हा जाहीरनामा केवळ आश्वासनांचा नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज संजय पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी, माजी महापौर, पदाधिकारी, काँग्रेसचे उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराणी ताराराणी जयंतीनिमित्त महिलांना समर्पित काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित
Total Views: 44