राजकीय
कोल्हापुरात काँग्रेसला धक्का! शारंगधर देशमुखांसह ३५ जण शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत
By nisha patil - 6/17/2025 9:31:39 PM
Share This News:
कोल्हापुरात काँग्रेसला धक्का! शारंगधर देशमुखांसह ३५ जण शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गळती, भाजप-शिंदे गटाकडून जोरदार शिडकाव
कोल्हापूरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ३५ जणांचा गट शिंदे सेनेत प्रवेश करणार असून, हा प्रवेश रविवारपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. या गटात १२ माजी नगरसेवक व अन्य पदाधिकारी यांचा समावेश असल्याचे देखील बोलले जाते
शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, राजेश क्षीरसागर यांनी आणखी ३५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशाचा दावा केला आहे. यामध्ये माजी महापौर, उपमहापौर आणि माजी नगरसेवक यांचा समावेश आहे. कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिंदे गट व भाजप दोघांनीही रणनीती आखली असून, शहराच्या राजकारणात मोठा उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात काँग्रेसला धक्का! शारंगधर देशमुखांसह ३५ जण शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत
|