राजकीय

काँग्रेस स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवणार — विजय वडेट्टीवार यांची घोषणा

Congress will contest Mumbai Municipal Corporation elections on its own


By nisha patil - 10/11/2025 1:46:06 PM
Share This News:



मुंबई — काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, या निर्णयामागे मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढता भ्रष्टाचार, शहराच्या आर्थिक तिजोरीची झालेली दुरवस्था आणि विकासकामांतील त्रुटी ही प्रमुख कारणे आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, “मुंबईतील पाणीटंचाई, नाले आणि नद्यांची स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेस ठाम भूमिका घेणार आहे. पक्षाच्या हायकमांडने स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून, त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसचा उद्देश केवळ सत्तेसाठी निवडणूक लढणे नसून, कार्यकर्त्यांना निवडणुकीत सहभागी होण्याची संधी देणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणे हा देखील आहे. ही स्वबळावरची लढत काँग्रेससाठी लिटमस टेस्ट ठरेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, समविचारी पक्षांकडून आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करण्याची तयारी काँग्रेसकडून दर्शवण्यात आली आहे.


काँग्रेस स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवणार — विजय वडेट्टीवार यांची घोषणा
Total Views: 23