बातम्या
क्रां. लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे संविधान दिन साजरा
By nisha patil - 11/26/2025 5:39:39 PM
Share This News:
क्रां. लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे संविधान दिन साजरा
कोल्हापूर, २६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना प्रतिष्ठानचे विधी सल्लागार व सिटी क्रिमिनलचे माजी अध्यक्ष अॅड. दत्ताजीराव कवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडा लोंढे, जॉन भोरे व महेश साळोखे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून उपस्थितांना जागरूकतेचा संदेश दिला.
यावेळी रुग्वेदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. कोमल लोंढे, प्रतिष्ठानचे सचिव विनायक पाटील, सामाजिक कार्यकर्ते साजिद मुल्ला, रणजित औंधकर, अजिंक्य कांबळे, प्रमोद डोंगरे, सतीश रास्ते, राजेंद्र जोशी, सुहास पाटील, सत्यजित कांबळे, बंकट सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य, विराज साळवी यांची उपस्थिती लाभली. संविधान मूल्यांचा गौरव आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
क्रां. लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे संविधान दिन साजरा
|