शैक्षणिक
निगवे दुमाला शाळेत संविधान दिन उत्साहात; मा विश्वनाथ अशोक पवार यांची भेट
By nisha patil - 11/27/2025 5:00:49 PM
Share This News:
निगवे दुमाला (शिये मतदारसंघ) : संविधान दिनाच्या औचित्याने शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील निगवे दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेला मा. विश्वनाथ पवार यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान शाळेत संविधान दिन सोहळा साजरा करण्यात आला. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती देण्यात आली.
माननीय पवार यांनी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधत शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत विचारपूस केली तसेच शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन केले. शाळेतील वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि चालू उपक्रमांची पाहणीही त्यांनी केली.
संविधान दिनानिमित्त झालेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला. शाळा व्यवस्थापनाने माननीय विश्वनाथ पवार यांचे आभार व्यक्त केले.
किशोर जासूद
निगवे दुमाला शाळेत संविधान दिन उत्साहात; मा विश्वनाथ अशोक पवार यांची भेट
|