बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये संविधान दिन उत्साहात संपन्न.
By nisha patil - 11/26/2026 11:03:41 PM
Share This News:
व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये संविधान दिन उत्साहात संपन्न.
*आजरा(हसन तकीलदार):-.व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये 26 नोव्हेंबर ,"भारतीय संविधान दिन" उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य एस.एन. पाटील,पर्यवेक्षका व्ही.जे.शेलार,ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. एन. ए.मोरे, श्रीमती एस.टी पाटील,सौ.एस.डी.इलगे यांच्या हस्ते संविधान प्रतिमा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचेकडून संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली. शाळेचे हिंदी विषयाचे शिक्षक व्ही.टी.कांबळे यांनी भारताचे संविधान व त्याचे महत्त्व या विषयावर आपले विचार मांडले. संविधानाने दिलेली मूल्ये यावर आपल्या देशाची लोकशाही नांदते. संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. संविधान निर्मात्यांचे अमूल्य असे योगदान या मार्गावर चालत जाणारा आपला भारतीय संघराज्य देश एकसंध फक्त संविधानामुळेच आहे.
अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान याची माहिती त्यांनी सांगितली. आर.पी होरटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी 26 /11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये संविधान दिन उत्साहात संपन्न.
|