ताज्या बातम्या
कांदे येथे मातंग समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ
By nisha patil - 9/1/2026 11:00:26 AM
Share This News:
कांदे (ता. शिराळा)
कांदे (ता. शिराळा) येथे मागासवर्गीय मातंग समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते कुदळ मारून या विकासकामाचा शुभारंभ झाला.
या सामाजिक सभागृहामुळे मातंग समाजातील नागरिकांना विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
यावेळी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश चव्हाण, सरपंच रोहित शिवजातक, उपसरपंच छानुसिंग पाटील, कांदे सेवा सोसायटीचे अध्यक्ष नानासो भडकिमकर, उपाध्यक्ष अनिल पवार, संजय पाटील, आनंदराव पाटील, संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कुंभार, गजानन पाटील, महादेव मोहरेकर, अमोल पाटील, धनाजी पाटील, सुभाष पाटील, आनंदा सपाटे, दिलीप शिवजातक आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी बी. ए. नादफ, दीपक पाटील, दिलीप पाटील, रणजितसिंह पाटील, आनंदराव कुंभार, संपत पाटील, वीरेंद्र साठे, दत्तात्रय शिंदे, समाधान पाटील, सिदकेश पाटील, शंकर येवले, गजानन साठे, भाऊ साठे, प्रकाश थोरवत, महादेव पाटील, दीपक गोसावी, निलेश पाटील, शैलेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच कांदे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभागृहामुळे सामाजिक एकोपा वाढीस लागेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कांदे येथे मातंग समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ
|