बातम्या
श्री क्षेत्र बाहुबली येथे यात्रिनिवास व भक्तनिवास बांधकामांना सुरुवात...
By nisha patil - 3/9/2025 5:10:31 PM
Share This News:
श्री क्षेत्र बाहुबली येथे यात्रिनिवास व भक्तनिवास बांधकामांना सुरुवात...
श्री क्षेत्र बाहुबलीत यात्रिनिवासासाठी १ कोटी निधी मंजूर
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील श्री क्षेत्र बाहुबली येथे पर्यटन सुविधांच्या विकासासाठी महत्त्वाची कामे सुरू झाली आहेत. "प्रादेशिक पर्यटन" योजनेतून यात्रिनिवासासाठी १ कोटी रुपये, तसेच "ब वर्ग यात्रा स्थळ" योजनेतून भक्तनिवासासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या दोन महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते झाला.
या लोकार्पण सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण दादा पाटील, श्री बाहुबली क्षेत्र दिगंबर जैन एन्डोमॅट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पिरगोंडा पाटील, उपाध्यक्ष आप्पासो चौगुले, सदस्य प्रदीप पाटील, दादा पाटील, नेंमगोंडा पाटील, अशोक पाटील, बाबासो चौगुले, समोशरण भोकरे, तात्यासो पाटील, ॲड. पी.आर. पाटील, शामगोंडा पाटीलa यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र बाहुबली येथे यात्रिनिवास व भक्तनिवास बांधकामांना सुरुवात...
|