बातम्या
*देवर्डे ता. आजरा येथील एकता गणेशोत्सव मंडळाचे विधायक कार्य
By nisha patil - 9/16/2026 11:32:19 PM
Share This News:
*देवर्डे ता. आजरा येथील एकता गणेशोत्सव मंडळाचे विधायक कार्य
*आजरा(हसन तकीलदार):-मागील 22 वर्षाची परंपरा असणारे एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देवर्डे यांचे तर्फे दरवर्षी विधायक कार्यें राबवली जातात. विधायक कार्यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून विविध कला गुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य हे मंडळ करीत आहे. मंडळातर्फे पर्यावरण पुरक गणेशउत्सव साजरा केला जातो.
यावर्षी एकता गणेशोत्सव मंडळातर्फे वैभव लक्ष्मी ब्लड बँक,कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवर्डे सारख्या छोट्याशा गावात जवळ जवळ 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले हे कौतुकास्पद आहे.सलग दोनवर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराबरोबरच गणपती डेकोरेशन, प्रश्न मंजुषा, बुद्धिबळ, रांगोळी यासारख्या स्पर्धांचे आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम मंडळ करीत आहे. त्याचबरोबर महिलासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रमही ठेवला जातो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रमेश गुंडू तेजम यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष महेंद्र तानवडे, खजिनदार गुरुनाथ तानवडे यांचेबरोबरच मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच वैभव लक्ष्मी ब्लड बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*देवर्डे ता. आजरा येथील एकता गणेशोत्सव मंडळाचे विधायक कार्य
|