बातम्या

राधानगरी पंचायत समिती सभागृहात सल्लामसलत कार्यशाळेचे आयोजन

Consultation workshop organized


By nisha patil - 3/9/2025 5:05:38 PM
Share This News:



राधानगरी पंचायत समिती सभागृहात सल्लामसलत कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर, दि. 3: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये वारंवार येणा-या महापूराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा व पंचगंगा नदीच्या पूर सौम्यिकरण उपाय योजना करण्याकामी शासनाकडून जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविला जात आहे.

त्या अंतर्गत राधानगरी धरणातून वाहणारे पाणी नियंत्रित करुन नदीतील पूर नियंत्रण करण्यासाठी राधानगरी धरणावर नवीन सांडवा बांधकाम करणे व सेवाद्वारांची दुरुस्ती करणे हे काम प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने पर्यावरणीय व सामाजिक परिणामा विषयी विचार विनियमाकरिता नागरिक तसेच शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांसाठी भागधारक सल्लामसलत कार्यशाळा शुक्रवार, दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत पंचायत समिती सभागृह, राधानगरी येथे आयोजित केली असून या सल्लामसलत कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.


राधानगरी पंचायत समिती सभागृहात सल्लामसलत कार्यशाळेचे आयोजन
Total Views: 86