राजकीय
ग्राहक पंचायत महाराष्ट्र गडहिंग्लज तालुका कार्यकारिणी जाहीर
By nisha patil - 9/1/2026 11:33:51 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या गडहिंग्लज तालुका कार्यकारणी मंडळाची निवड जाहीर झाली. आजरा -गडहिंग्लज -चंदगड गारगोटी चे विभाग प्रमुख कॉ.शिवाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या गडहिंग्लज येथील बैठकीत नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये बस्तू रुजया बार्देसकर यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी डॉक्टर महादेव ढोकरे पाटील व तानाजी कुराडे यांची निवड करण्यात आली.
सचिवपदी अनिल कलगुटगी, कायदे सल्लागार - ऍड.अक्षय गुरव व माधव सबनीस.
महिला संघटिका म्हणून रोहिणी चौगुले,रत्ना सुतार यांची तर सदस्य पदी आशा ढोकरे पाटील, संजीवनी पाटील , पुष्पा चिटणीस, अविनाश तकीलदार, अमोल डवरी, सुरेश वडराळे, महादेव शिंगे यांची निवड केली असून सल्लागारपदी ईश्वर देसाई यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिवाजी गुरव यांनी नवीन कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी म्हटले की,ग्राहकांना न्याय देण्यासाठी आपण सदैव तयार राहिले पाहिजे व संघटनेसाठी वेळ दिला पाहिजे प्राथमिक स्तरावर एखादे प्रकरण मिटले नाही तर ग्राहक न्यायालयात दाद मागण्यासाठी कार्यकर्ते सदैव मार्गदर्शन करून मदतही करतील व ते अन्याय झालेल्या ग्राहकाला न्याय मिळेपर्यंत पाठबळ देतील अशी ग्वाही दिली.
शेवटी आभार आशा ढोकरे पाटील यांनी मानले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र गडहिंग्लज तालुका कार्यकारिणी जाहीर
|