ताज्या बातम्या
crime.......अंबप फाट्याजवळ कंटेनर व गॅस टाकीच्या टेम्पोचा अपघात: सुदैवाने जीवितहानी टळली
By nisha patil - 7/7/2025 2:08:08 PM
Share This News:
अंबप फाट्याजवळ कंटेनर व गॅस टाकीच्या टेम्पोचा अपघात: सुदैवाने जीवितहानी टळली
अंबप (. प्रतिनिधी किशोर जासूद ) : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास एक भीषण अपघात टळल्याची घटना घडली. भरधाव येणाऱ्या चौदा चाकी कंटेनरने समोरून जात असलेल्या रिकाम्या गॅस टाक्या वाहून नेणाऱ्या टेम्पो ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहने महामार्ग आणि सेवा रस्त्यामधील सुमारे पाच ते सहा फूट खोल खड्ड्यात अडकून पडली. अपघाताच्या वेळी वाहनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले असून, एक मोठा अनर्थ टळला आहे.
प्राथमिक माहितीप्रमाणे, भारत पेट्रोलियमचा टेम्पो ट्रक कोल्हापूरमध्ये गॅस टाक्या खाली करून रिकाम्या टाक्या घेऊन पुण्याकडे निघाला होता. अंबप फाट्याजवळील हॉटेल मंथन एक्झिक्युटिव्हच्या जवळ पोहोचल्यावर मागून आलेल्या कंटेनरचालकाचा ताबा सुटल्यामुळे त्याने ट्रकला जोरदार धडक दिली.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, वेळीच मदतकार्य हाती घेण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली
crime....अंबप फाट्याजवळ कंटेनर व गॅस टाकीच्या टेम्पोचा अपघात: सुदैवाने जीवितहानी टळली
|