बातम्या

"हिंदी सक्तीवरून वाद: सरकारचं यु-टर्न, विद्यार्थ्यांना पर्यायी भाषा निवडण्याची मुभा"

Controversy over compulsory Hindi Governments U turn


By nisha patil - 4/21/2025 4:31:39 PM
Share This News:



"हिंदी सक्तीवरून वाद: सरकारचं यु-टर्न, विद्यार्थ्यांना पर्यायी भाषा निवडण्याची मुभा"

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सुरू होत आहे. नव्या धोरणानुसार पहिलीपासूनच मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्यात आली होती. मात्र, यावरून राजकीय पक्षांसह विविध संस्था व संघटनांनी जोरदार टीका केली.

यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. हिंदी ऐवजी विद्यार्थ्यांना दुसरी कोणतीही भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय खुला असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. "विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदी न निवडता मल्याळम, तमिळ किंवा इतर भारतीय भाषा निवडल्यास त्यांनाही ती संधी दिली जाईल," असं ते म्हणाले.

याशिवाय, ज्या भाषेसाठी किमान 20 विद्यार्थी असतील, त्याठिकाणी त्या भाषेचा शिक्षक नियुक्त केला जाईल. जर विद्यार्थी संख्या कमी असेल, तर संबंधित भाषा ऑनलाईन माध्यमातून शिकवण्याचा विचार सरकार करत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

सरकारच्या या निर्णयामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून झालेल्या वादावर काहीसा पडदा पडला असून, विद्यार्थ्यांना भाषेच्या निवडीत मुभा देण्याकडे सरकारने पाऊल टाकल्याचं स्पष्ट होत आहे.


"हिंदी सक्तीवरून वाद: सरकारचं यु-टर्न, विद्यार्थ्यांना पर्यायी भाषा निवडण्याची मुभा"
Total Views: 130