विशेष बातम्या
रेणुका देवीच्या मानाच्या जगावरून वाद – पोलिसांच्या मध्यस्थीने मिरवणूक मार्गस्थ
By nisha patil - 12/8/2025 5:33:36 PM
Share This News:
रेणुका देवीच्या मानाच्या जगावरून वाद – पोलिसांच्या मध्यस्थीने मिरवणूक मार्गस्थ
कोल्हापूर – श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रेणुका देवीच्या मानाच्या जगाची मिरवणूक पुढे नेण्यावरून दोन गटांमध्ये सोमवारी दुपारी जोरदार वाद झाला. "आमच्या जगाचा मान अधिक" या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि हातघाईपर्यंत परिस्थिती पोहोचली. यामुळे तब्बल दोन तास मिरवणूक थांबली.
ओढ्यावरच्या रेणुका मंदिरातून देवीची पालखी आणि मानाचे जग निघाले होते. शांताबाई सोनाबाई जाधव, बायका बाई चव्हाण, लक्ष्मीबाई जाधव, रेणुका नगर पाचगाव मंदिरातील पालखी आणि बेलबागेतील आळवेकर जग अशी मानाची जग एकत्र आली होती. पूजाविधीनंतर बेलबागेतील आळवेकर जग व पालखी पुढे गेली, मात्र ओढ्यावरील मंदिरातील जग थांबले. यावरून वाद निर्माण होऊन धक्काबुकीही झाली.
शाहूपुरी पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक पुन्हा सुरू झाली आणि पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाली. या गोंधळामुळे मिरवणुकीला दोन ते अडीच तासांचा उशीर झाला.
रेणुका देवीच्या मानाच्या जगावरून वाद – पोलिसांच्या मध्यस्थीने मिरवणूक मार्गस्थ
|