राजकीय
सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या
By nisha patil - 8/20/2025 1:43:44 PM
Share This News:
सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या....
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्याने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पावसाची सद्यस्थिती लक्षात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
अपर निबंधक तथा सह सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार, ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे, निवडणुकीनंतर पहिली पदाधिकारी निवड प्रलंबित आहे किंवा न्यायालयीन आदेशानुसार निवडणूक होणार आहे अशा संस्थांना अपवाद ठेवून, उर्वरित सर्व "अ" व "ब" वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सर्व जिल्हा व तालुका/प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या....
|