विशेष बातम्या

अलमट्टीच्या विसर्गाबाबत समन्वय सुरू – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Coordination underway regarding discharge of Almatti


By nisha patil - 8/21/2025 5:18:45 PM
Share This News:



अलमट्टीच्या विसर्गाबाबत समन्वय सुरू – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची उघडीप सुरू झाली असून धरणांमधून होणारा विसर्ग हळूहळू कमी होत आहे. कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा धरणांचा विसर्ग घटल्याने पुढील दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अलमट्टीच्या विसर्गाबाबतही समन्वय सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ स्थिरावत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पूराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये, तसेच पाण्यात वाहन चालवून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी तसेच हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थलांतरीत पूरग्रस्तांसाठी श्री दत्त महाविद्यालयातील निवारा केंद्रालाही भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. पूरग्रस्तांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पाहणीदरम्यान इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसिलदार अनिलकुमार हेळकर, अपर तहसिलदार महेश खिलारी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.


अलमट्टीच्या विसर्गाबाबत समन्वय सुरू – जिल्हाधिकारी अमोल येडगे
Total Views: 109