बातम्या

*नगरसेवक आसिफ सोनेखान यांनी केला यशवंत गुणवंतांचा सत्कार

Corporator Asif Sonekhan felicitated Yashwant Gunwant


By nisha patil - 9/29/2026 3:25:21 PM
Share This News:



*नगरसेवक आसिफ सोनेखान यांनी केला यशवंत गुणवंतांचा सत्कार
 

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतचे प्रभाग क्र. 8 चे नगरसेवक आसिफ सोनेखान यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याबरोबरच यशवंत गुणवंतांचा मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन यथोचित सत्कार केला.
     

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिजवान माणगावकर यांनी केले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक युनूस लाडजी म्हणाले की, हा कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. माणूस स्वतःसाठी जगतच असतो. स्वतःसाठी जगणारे भरपूरजण आहेत परंतु दुसऱ्यासाठी आणि समाजासाठी जगणारा खरा माणूस असतो. पाठीवरील एक थाप या गुणवंतासाठी ऊर्जा देण्याचे काम करते. कौतुकाची ही थाप अनमोल असते. ही थाप त्यांना पुढच्या भरारीसाठी ऊर्जा देते.मुलासाठी, समाजासाठी आपले काहीतरी देणे आहे ही भावना उराशी बाळगून केलेले हे कार्य खरोखरच उल्लेखनीय आणि आदर्शवत आहे असे गौरवोदगार काढले.
     

यावेळी वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक झालेबद्दल रमीज दीडबाग, ऍनिमेशन परीक्षेत शिवाजी विद्यापीठात प्रथम आलेबद्दल सफवान इप्पेरी, नॅशनल कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकवल्याबद्दल सुहाना हिंग्लजकर तसेच शालेय विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या जारा माणगावकर, जिया लमतुरे, बरीरा खेडेकर, युसरा बुड्डेखान, राहत नाईकवाडे, सिदरा मुराद, आयमान कांडगावकर या विद्यार्थिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
   

 यावेळी रजाक सोनेखान,आलम नाईकवाडे, इब्राहीम इंचनाळकर, अमजद माणगावकर, इम्रान लमतुरे,बशीर दाऊद तकीलदार, फैजान खलीफ, जावेद नेसरीकर, इरफान काझी, अबू माणगावकर, नईम मुराद, मोहसीन आगलावे आदिजण उपस्थित होते. शेवटी सलीम शेख यांनी आभार मानले


*नगरसेवक आसिफ सोनेखान यांनी केला यशवंत गुणवंतांचा सत्कार
Total Views: 10