विशेष बातम्या

नगरसेविका रेश्मा बुडडेखान ऍक्शन मोडवर

Corporator Reshma Buddekhan in action mode


By nisha patil - 2/16/2026 5:48:37 PM
Share This News:



नगरसेविका रेश्मा बुडडेखान ऍक्शन मोडवर


आजरा(हसन तकीलदार) :- नगरपंचायतीच्या निवडणूकीनंतर परवाच मासिक सभा संपन्न झाली सर्वच नूतन नगरसेवकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत कामात सुधारणा करण्याबाबत सूचना मांडल्या. *विकासाचा निधी किती आणला यापेक्षा त्या निधीचा विनियोग योग्य ठिकाणी झाला की नाही, निधीचा वापर पुरेपूर झाला का? या बाबी महत्वाच्या आहेत असे काहींनी आपले मत मांडताना सांगितले.
 कोट्यावधीची पाणी योजना आली खरी, पण योजनेचे नियोजन व आराखडा चुकला असल्याचे दिसून येत आहे. साहित्याची प्रत, कामाचे नियोजन, आराखडा, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अशा महत्वाच्या बाबी आता निदर्शनास येत आहेत.
 दर्गागल्ली येथील नवीन पाण्याची पाईप केवळ दोन ते अडीच फूट खोलीवर घातल्याचे सौ. रेश्मा नौशाद बुडडेखान यांनी निदर्शनास आणून देत यातील त्रुट्याही दाखवून दिल्या. रस्त्यासाठी जवळ जवळ दोन ते अडीच फूट खुदाई सुरु आहे. आणि पाईप केवळ दोन ते अडीच फूट खोलीवर आहे. रस्त्यासाठी खुदाई केल्यावर पाईप उघडीच पडणार असून यासाठी ठरलेप्रमाणे चार ते साडे चार फूट खोल पाईप घालून नंतर रस्ता करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी मानसी कदम, ठेकेदार आर.डी. पवार, बाळू चव्हाण यांना सौ. बुडडेखान यांनी सूचना केल्या. त्यांनी सदर पाईप लाईन चार फूट खोल घालून नंतर रस्ता करण्याचे मान्य केले. नगरसेविका सौ. रेश्मा नौशाद बुडडेखान यांच्या कार्यतत्परतेचे वॉर्डात कौतुक होत आहे.


नगरसेविका रेश्मा बुडडेखान ऍक्शन मोडवर
Total Views: 8