विशेष बातम्या
आजरा नगरपंचायतीसाठी नगरसेवक आरक्षण जाहीर; नगराध्यक्ष पदासाठी उत्सुकता वाढली
By nisha patil - 8/10/2025 4:09:25 PM
Share This News:
आजरा नगरपंचायतीसाठी नगरसेवक आरक्षण जाहीर; नगराध्यक्ष पदासाठी उत्सुकता वाढली
आजरा(हसन तकीलदार): आजरा नगरपंचायतीच्या आगामी सर्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी खुला आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकतेची लाट पाहायला मिळत आहे.
आजरा-भुदरगचे प्रांताधिकारी हरीश सूळ आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यापासून प्रत्येक उमेदवार आपल्या रणनीतीत लागल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभागनिहाय आरक्षणानुसार प्रभाग क्र. 1, 4, 10, 12, 13, 14, 15 सामान्य वर्गासाठी, प्रभाग क्र. 2 आणि 8 ओबीसी पुरुषांसाठी, प्रभाग क्र. 3, 5, 9 ओबीसी महिलांसाठी, प्रभाग क्र. 6, 11, 16, 17 सामान्य महिला, तर प्रभाग क्र. 7 अनुसूचित जाती महिला असे आरक्षण ठरले आहे.
यावेळी नगरपंचायतीतील काही प्रभागांमध्ये उमेदवार रिंगणात उतरताना अन्य वार्डातील व्यक्ती देखील सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
आरक्षण सोडत कार्यक्रमात अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोआण्णा चराटी, अभिषेक शिंपी, विलास नाईक, जनार्दन टोपले, अनिकेत चराटी, बामणे भाऊजी, किरण कांबळे, अभिजित रांगणेकर, भिकाजी विभुते यांसह नागरिक उपस्थित होते. काहींसाठी आरक्षण जाहीर केल्याचा आनंद तर काहींसाठी नाराजीचा विषय ठरला आहे.
आता पाहणे उत्सुकतेने राहिले आहे की, नगराध्यक्ष पदासाठी कोणते नाव रिंगणात येते आणि प्रभागनिहाय स्पर्धा कशी आकार घेते.
आजरा नगरपंचायतीसाठी नगरसेवक आरक्षण जाहीर; नगराध्यक्ष पदासाठी उत्सुकता वाढली
|