राजकीय

कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व ३ नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी अवघ्या ६ दिवसांवर

Counting of votes for 10 municipal council


By nisha patil - 12/16/2025 11:30:54 AM
Share This News:



कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद आणि ३ नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली असून प्रशासनाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. मतमोजणीदरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढणे, जल्लोष करणे, फटाके फोडणे अथवा गुलाल उधळणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, भयमुक्त व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली असून केवळ अधिकृत कर्मचारी आणि उमेदवारांचे मान्य प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

या प्रतिबंधित परिसरात

  • मोबाईल फोन व वायरलेस उपकरणांचा वापर

  • छायाचित्रण व चित्रीकरण

  • मोठ्या वाहनांची वर्दळ

  • कोणत्याही प्रकारचा जल्लोष
    यावर बंदी घालण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, आदेशांचे उल्लंघन केल्यास दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व ३ नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी अवघ्या ६ दिवसांवर
Total Views: 88