राजकीय
ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबरलाच मतमोजणी : सुप्रीम कोर्ट
By nisha patil - 5/12/2025 1:01:48 PM
Share This News:
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतदान किंवा मतमोजणीची तारीख पुढे आणण्यासाठी केलेल्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबरलाच मतमोजणी पार पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.
निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार देत, निवडणूक आयोगाने ठरवलेले वेळापत्रकच अंतिम मानले आहे, असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे मतमोजणीची तारीख बदलण्याची कोणतीही शक्यता संपुष्टात आली आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे उमेदवार, पक्ष, प्रशासन आणि मतदार यांच्यातील संभ्रम दूर झाला असून सर्वांना आता 21 डिसेंबरच्या मतमोजणीची प्रतीक्षा आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील निवडणुकीचे वातावरण त्यामुळे आणखी रंगतदार झाले आहे
ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबरलाच मतमोजणी : सुप्रीम कोर्ट
|