राजकीय

दिलशाद मुल्ला यांना कोर्टाचा दिलासा; नगरसेवक पद तूर्तास वाचले!

Court gives relief to Dilshad Mulla


By nisha patil - 11/20/2026 3:44:51 PM
Share This News:



दिलशाद मुल्ला यांना कोर्टाचा दिलासा; नगरसेवक पद तूर्तास वाचले!

 

कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका दिलशाद मुल्ला यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पद तूर्तास वाचले आहे. दिलशाद मुल्ला यांच्या जात प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत हे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली होती.

मात्र, या निर्णयाला दिलशाद मुल्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना कोल्हापूर खंडपीठाने जात पडताळणी विभागाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे दिलशाद मुल्ला यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे नगरसेवक पद तूर्तास कायम राहणार आहे. या न्यायालयीन निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


दिलशाद मुल्ला यांना कोर्टाचा दिलासा; नगरसेवक पद तूर्तास वाचले!
Total Views: 7