बातम्या
कोल्हापूर महापालिकेचा दणका! ६ दुकाने सील; २.२४ लाखांची वसुली!
By nisha patil - 10/10/2026 3:25:55 PM
Share This News:
कोल्हापूर महापालिकेचा दणका! ६ दुकाने सील; २.२४ लाखांची वसुली!
कोल्हापुरात विनापरवाना व्यवसाय आणि घरफाळा थकबाकीदारांविरोधात महापालिकेने धडक कारवाई केली आहे. बिंदू चौक ते शाहू टॉकीज रोडवरील आयुष मोबाईल, शिवम मोबाईल, एस मोबाईल, नसिम मुजावर, फॅशन कॉर्नर आणि महालक्ष्मी एंटरप्रायझेस या सहा व्यावसायिक आस्थापनांना सील ठोकण्यात आले. याच कारवाईदरम्यान घरफाळा आणि इतर थकबाकीपोटी दोन लाख २४ हजार २६५ रुपये वसूल करण्यात आले. तसेच बाजार गेट ते पापाची तिकटी रोडवरील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या ७० व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भाडेकरूंसाठी २९, तर घरफाळा थकबाकीदार १३ मिळकतधारकांनाही नोटिसा देण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियंत्रणाखाली विविध विभागांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. विनापरवाना व्यवसाय आणि कर थकबाकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी परवाना घेऊनच व्यवसाय करावा आणि महापालिकेची थकबाकी वेळेत भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेचा दणका! ६ दुकाने सील; २.२४ लाखांची वसुली!
|