बातम्या

पुष्पनगर दरोडेखोरांच्या टोळीला भुदरगड पोलिसांचा चाप – अवघ्या दोन दिवसांत बारा दरोडेखोर जेरबंद

Crem news९


By nisha patil - 9/18/2025 9:09:12 AM
Share This News:



पुष्पनगर दरोडेखोरांच्या टोळीला भुदरगड पोलिसांचा चाप – अवघ्या दोन दिवसांत बारा दरोडेखोर जेरबंद

✍️ प्रतिनिधी – ओंकार सावंत, गारगोटी भुदरगड – पुष्पनगर येथे सराफी दुकान व घरफोडी करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत टोळीचा भुदरगड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ दरोडेखोरांना जेरबंद करून लाखांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप वाहन जप्त केले.

सोमवारी पहाटे पुष्पनगर येथील आशिष अरविंद होगाडे यांच्या सराफी दुकानात तसेच शेजारील बांगड्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चाहुल लागल्याने तो प्रयत्न फसला. यावेळी चोरट्यांनी गावातील शामराव रावजी बाबर यांच्या घरातून सुमारे एक लाख रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने लंपास केले होते. याबाबत भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

घटनास्थळावरील माहितीचा बारकाईने अभ्यास करून पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दोन तपास पथके तयार केली. गुप्त माहितीच्या आधारे आदमापूर येथे छापा टाकून नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत उघड झाल्यानंतर आणखी तीन साथीदारांना बुधवारी अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल तसेच वाहन जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, शाहबाज शेख, योगेश गोरे, सहायक फौजदार महादेव मगदुम, पोहेकॉ विनोद दबडे, सुभाष चौगले, रुपाली रानगे, राजु गाडीवड्ड, रोहित टिपुगडे, विक्रम चौत्रे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

अटक झालेल्या आरोपींत सिकंदर गोविंद काळे (३७), प्रकाश बन्सी काळे (२६), रमेश विलास शिंदे (३५), आक्काबाई सिकंदर काळे (३०), विलास छन्नु शिंदे (५२), चंदाबाई विलास शिंदे (५०, सर्व रा. इटकोर, ता. कळंब, जि. धाराशिव), शंकर पोपट शिंदे (२०), राजन दत्ता शिंदे (२०, रा. कोठाळवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव), सोमनाथ उर्फ सोम्या सुंदर पवार (२५, रा. वरपगाव, ता. केज, जि. बीड), मंगल रमेश शिंदे (३६), राजेंद्र बप्पा पवार (६५), ललीता राजेंद्र पवार (४२, रा. वाकडी) यांचा समावेश आहे.

 

भुदरगड पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे अवघ्या दोन दिवसांत सराईत दरोडेखोर टोळी जेरबंद झाली असून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 


पुष्पनगर दरोडेखोरांच्या टोळीला भुदरगड पोलिसांचा चाप – अवघ्या दोन दिवसांत बारा दरोडेखोर जेरबंद
Total Views: 42