बातम्या
नंदगाव माळावर बारबाला नाच गाण्याने खळबळ, इस्पुर्ली पोलिसांची कारवाई
By Administrator - 10/15/2025 10:56:17 PM
Share This News:
नंदगाव माळावर बारबाला नाच गाण्याने खळबळ, इस्पुर्ली पोलिसांची कारवाई
करवीर तालुक्यातील नंदगाव गावात काही तरुणांनी माळावर बारबाला आणून नाच गाण्याचा प्रकार घडवून खळबळ उडवली. हा प्रकार गायरान जमिनीवरील उघड्या माळावर घडल्याने गावात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
इस्पुर्ली पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत काही तरुण आणि तीन मुलींना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन काहीजण पळून गेले आहेत. ताब्यात घेतलेल्या तरुणांवर तसेच बारबालांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
नंदगावचे नागरिक या प्रकारामुळे नाराज आहेत आणि पोलिसांकडून योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत
नंदगाव माळावर बारबाला नाच गाण्याने खळबळ, इस्पुर्ली पोलिसांची कारवाई
|