बातम्या

Crime.....धर्मांतरण रॅकेटचा मुख्य सूत्रधार छांगुर बाबा 100 कोटीचा मालक..

Crime news0


By nisha patil - 7/7/2025 10:43:33 PM
Share This News:



धर्मांतरण रॅकेटचा मुख्य सूत्रधार छांगुर बाबा 100 कोटीचा मालक..


40 बँक खाती, आखाती देशांतून निधी, बनावट संस्था; छांगुर बाबाचा गूढ कारभार उघड

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात धर्मांतरण रॅकेट चालवत असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीन चर्चेत आला आहे. त्याच्या आणि संबंधित संस्थांच्या बँक खात्यांत 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याचे उघड झाले आहे. ईडीने तपास सुरू केला असून एटीएसने संपूर्ण अहवाल सादर केला आहे.

एकेकाळचा अंगठ्या विकणारा छांगुर बाबा अलिशान बंगला, महागड्या गाड्या आणि बनावट संस्थांचा मालक बनला आहे. त्याचे नेटवर्क देशभर पसरले असून 40 पेक्षा अधिक बँक खाती, 40–50 वेळा मुस्लिम देशांना केलेल्या यात्रा, आखाती देशांतून आलेला निधी, अशा अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत.

त्याचे 14 साथीदार व 3-4 कथित पत्रकारांच्या शोधात पोलिस पथके रवाना झाली असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.


Crime....धर्मांतरण रॅकेटचा मुख्य सूत्रधार छांगुर बाबा 100 कोटीचा मालक..
Total Views: 87